क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव.
पंढरपूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि संघभावना रुजविणाऱ्या प्रा. विपुल गोसावी यांना सन २०२६ चा प्रतिष्ठित ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. गोसावी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार मिळाल्याने प्रा. विपुल गोसावी यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

Post a Comment
0 Comments