भाविकांची मोठी गर्दी; चमत्कार की विज्ञानाचं कोडं?
भूम (धाराशिव) : तालुक्यातील पाथरूड येथे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी आल्याची घटना सोमवारी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी समोर आली. बाप्पाच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
गणपती बाप्पाच्या डोळ्यांत पाण्याचे थेंब दिसत असल्याने अनेक भाविकांनी याला दैवी चमत्कार मानत श्रद्धेने दर्शन घेतले. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मूर्तीखाली किंवा आजूबाजूला साचलेले पाणी मूर्तीच्या सूक्ष्म छिद्रांमधून शोषले जाऊन बाहेर येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडूनही पाहणी करण्यात येत असून, हा चमत्कार आहे की नैसर्गिक/वैज्ञानिक प्रक्रिया, याचे गूढ तपासणीनंतरच उलगडणार आहे.
श्रद्धा आणि विज्ञानाच्या या अनोख्या संगमामुळे पाथरूडची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Post a Comment
0 Comments