संपादक: प्रा.सदानंद बनसोडे.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा स्तुत्य सहभाग
मोडनिंब : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बाबू तात्या सुर्वे, माजी सरपंच कैलास दादा तोडकरी, उपसरपंच अमित कोळी, कुंभार गुरुजी, सत्यनारायण गिड्डे, सदाशिव पाटोळे, पाटील सर, दीपक सुर्वे, मनसेचे प्रशांत गिड्डे, किरण तोडकरी, श्रीकांत लादे, वडोपंत तोडकरी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी शुभम गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
“शिक्षणातून समाज घडतो आणि शिक्षक हा त्या परिवर्तनाचा शिल्पकार असतो,” या विचाराची प्रेरणा देणाऱ्या डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात आदर, कृतज्ञता आणि शैक्षणिक मूल्यांचा जागर करण्यात आला.

Post a Comment
0 Comments