Type Here to Get Search Results !

राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप




 

टेंभुर्णी येथील निवासी शाळेत वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम

टेंभुर्णी : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांचे विश्वासू सहकारी व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील मुकबधिर निवासी शाळेत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटक पोपट मामा लोंढे (वेणेगाव, ता. माढा) यांच्या वतीने शाळेतील लहान मुले व मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमातून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली.

यावेळी मुकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे माढा तालुकाध्यक्ष माननीय मारुती वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष माननीय दादासाहेब बनसोडे, माढा तालुका कार्याध्यक्ष बिभीषण कांबळे, वेणेगाव शाखाध्यक्ष अनिकेत लोंढे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मुकबधिर निवासी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिपाई आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता वंचित व विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments