मोडनिंब :
पावसाने दडी मारल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक श्रद्धेनुसार मोडनिंब शहरात गाढवाचे लग्न लावण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
या वेळी गाढवाला सजवून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. लग्नासाठी आवश्यक विधी करण्यात आले. नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत पावसासाठी प्रार्थना केली. यावेळी परिसरात पारंपरिक वातावरण निर्माण झाले होते.
पावसाअभावी शेतीच्या कामांवर परिणाम होत असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी एकत्र येत पावसासाठी साकडे घातले. या अनोख्या उपक्रमाची मोडनिंब शहरात चर्चा रंगली असून, लवकरच समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments