Type Here to Get Search Results !

वेदांत वलगेची इस्रो व आयआयटी गांधीनगर अभ्यासदौऱ्यासाठी निवड!

 


एस. पी. स्कूल व वेदांता अकॅडमी, नांदोरेच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा.

नांदोरे : प्रतिनिधी

पायल फाउंडेशन संचलित एस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमी, नांदोरे (ता. पंढरपूर) येथील विद्यार्थी वेदांत संतोष वलगे याची इस्रो (अहमदाबाद) व आयआयटी (गांधीनगर) येथे अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय निवडीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अवकाश क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण व्हावे, तसेच नामांकित वैज्ञानिक व तंत्रज्ञान संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन ज्ञानाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात वेदांतला इस्रोच्या कार्यपद्धतीची, अवकाश संशोधनाची तसेच आयआयटी गांधीनगरमधील उच्च शिक्षण व तंत्रज्ञानविषयक वातावरणाची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.

आज वेदांत अभ्यासदौऱ्यासाठी रवाना होत असून, त्याच्या या निवडीबद्दल शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.

या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, खजिनदार विक्रम भिंगारे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, विभाग प्रमुख साईनाथ कुंभार, फाउंडेशन विभाग प्रमुख विकास तिवारी, CBSE कॅम्पस प्रमुख सचिन डोके तसेच शिक्षकवृंदांनी वेदांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वेदांतच्या या निवडीमुळे “ध्येय गुणवत्तेचे, गुणवत्ता शिक्षणाची” या शाळेच्या ध्येयवाक्याला साजेसे यश मिळाले असून, विद्यार्थ्यांच्या मोठ्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments