पुणे / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वी च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबतचे प्रकटन काढले आहे. पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी परीक्षा वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षांचे वेळापत्रक असे -
लेखी परीक्षा :
इयत्ता १२वी (HSC) :
सोमवार, दि. ०९ फेब्रुवारी, २०२७ ते मंगळवार, दि. १६ मार्च, २०२७
इयत्ता १०वी (SSC) :
सोमवार, दि. १५ फेब्रुवारी, २०२७ ते गुरुवार, दि. ११ मार्च, २०२७
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन :
-इयत्ता १२वी :
बुधवार, दि. २० जानेवारी, २०२७ ते शनिवार, दि. ०६ फेब्रुवारी, २०२७
इयत्ता १०वी :
गुरुवार, दि. २८ जानेवारी, २०२७ ते शनिवार, दि. १३ फेब्रुवारी, २०२७
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.


Post a Comment
0 Comments