रोटरी क्लब ऑफ मोडनिंबतर्फे भव्य गौरी आरास स्पर्धेचे आयोजन
मोडनिंब : गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोडनिंब परिसराती गौरी आरास स्पर्धेतून सजणार मोडनिंबचा उत्सव! ल महिला भगिनींच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच सामाजिक संदेशाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मोडनिंब यांच्या वतीने यंदाही ‘गौरी आरास स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
गौरी सजावटीसोबतच पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, आरोग्य, भारतीय संस्कृती, युवा प्रबोधन, आध्यात्मिकता तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित आरास सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकांनी गौरी आरास व सामाजिक संदेशाची माहिती एक ते दोन मिनिटांत देणे आवश्यक आहे. तसेच आरासमध्ये प्लास्टिकचा वापर कमीत कमी असावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.
🏆 आकर्षक बक्षिसांची मेजवानी
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹५,४४४, द्वितीय क्रमांकासाठी ₹३,५००, तर तृतीय क्रमांकासाठी ₹३,००१ रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय चौथ्या ते सहाव्या क्रमांकासाठीही विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेसाठी परीक्षकांकडे परीक्षेसाठी भेट देण्याचे नियोजित दिवस १७ व १८ सप्टेंबर २०२६ असे जाहीर करण्यात आले असून, नावनोंदणीसाठी १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे गौरी सजावटीसोबत सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश घराघरात पोहोचणार असून, मोडनिंब परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
“गौरीची आरास सजवा... सामाजिक संदेशाचा प्रकाश पसरवा!” असा संदेश देत रोटरी क्लब ऑफ मोडनिंबने सर्व महिला भगिनींना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments