Type Here to Get Search Results !

ना डीजेचा दणदणाट, ना गाड्यांचा ताफा… सायकलवरून गणपती बाप्पांचे आगमन!

 फलटण–पिंपोड रस्त्यावर साधेपणातील भक्तीचा हृदयस्पर्शी अनुभव

फलटण : गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आजकाल आकर्षक सजावट, डीजेचा दणदणाट आणि वाहनांच्या ताफ्याची लगबग पाहायला मिळते. मात्र, फलटण–पिंपोड रस्त्यावर एका आजोबांनी सायकलवरून गणपती बाप्पांना घरी नेताना साधेपणातील भक्तीचे सुंदर दर्शन घडविले.

अंगात साधा पांढरा सदरा, हातात सायकलचे हँडल आणि सायकलच्या पुढील बाजूस सुरक्षितपणे विराजमान केलेली गणपती बाप्पांची मूर्ती… या दृश्याने भक्तीला दिखाव्याची नव्हे, तर भावनेची आणि काळजीची गरज असते, हे अधोरेखित केले.

“ना डीजेचा दणदणाट, ना गाड्यांचा ताफा…


आहे ती फक्त अथांग भक्ती आणि काळजी!” अशा आशयाचा संदेश या छायाचित्रासोबत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. वाहनाचा वेग कितीही असो, मात्र बाप्पांना सुरक्षितपणे घरी नेण्याची काळजी या आजोबांनी घेतल्याचे या प्रसंगातून दिसून येते.

श्रीमंती साधनांमध्ये नाही, तर भावनेमध्ये असते, हे सांगणारा हा साधा पण मनाला भिडणारा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गणपती बाप्पांवरील श्रद्धा, साधेपणा आणि सुरक्षिततेची जाणीव यांचा सुंदर संगम या आगमनातून पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments