Type Here to Get Search Results !

शैक्षणिक कार्याचा गौरव!

 

डॉ. कुमार लोंढे यांना ‘उत्कृष्ट शिक्षण सम्राट पुरस्कार’

नातेपुते | प्रतिनिधी

शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. कुमार लोंढे यांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त ‘उत्कृष्ट शिक्षण सम्राट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, नातेपुते यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कुमार लोंढे यांनी हा सन्मान सपत्नीक डॉ. पंचशीला लोंढे यांच्या उपस्थितीत स्वीकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. पी. मोरे होते. मार्गदर्शक विकास दादा धाईंजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक पोपट साळवे व अध्यक्ष विशाल जी. साळवे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

याच कार्यक्रमात पत्रकारिता, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

डॉ. कुमार लोंढे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आजवर ३५ पेक्षा अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हे पुरस्कार केवळ सन्मान नसून समाजासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

“सन्मान वाढवतो… पण जबाबदारी त्याहून अधिक वाढवतो!” या भावनेतून त्यांनी संस्थेचे, आयोजकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

— भारत स्पंदन न्यूज



Post a Comment

0 Comments