Type Here to Get Search Results !

30 वर्षांचा पाणीप्रश्न… अवघ्या ८ दिवसांत मार्गी!

 

 आमदार अभिजीत ‘आबा’ पाटील यांच्या पाठपुराव्याने जाधववाडीपर्यंत पाईपलाईन..

जाधववाडी-मोडनिंब येथील गावठाण तलावात पाणी आणून संपूर्ण गावाला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामस्थ गेल्या ३० वर्षांपासून संघर्ष करत होते.

ग्रामस्थांनी पाईपलाईनची मागणी आमदार अभिजीत ‘आबा’ पाटील यांच्याकडे मांडताच त्यांनी तातडीने पाठपुरावा केला आणि अवघ्या ८ दिवसांत पाईपलाईन जाधववाडीपर्यंत पोहोचली! 🚰

या पाईपलाईनमुळे गावठाण तलावात पाणी आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जाधववाडी तसेच परिसरातील गावांनाही याचा लाभ होणार आहे.

३० वर्षांचा संघर्ष…

ग्रामस्थांची मागणी…

आणि अवघ्या ८ दिवसांत प्रत्यक्ष काम!

याच पाईपलाईनचे आज ज्येष्ठ नेते भारत आबा शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी बाबुतात्या सुर्वे, पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, नितीन गडधरे, संतोष दळवी, प्रवीण माने, विठ्ठल मोरे, सौदागर जाधव, राजकुमार जाधव, अभिजीत जाधव, उदय जाधव, संतोष मुटकुळे, संभाजी काळे, अख्तर तांबोळी, निलेश काळे, महादेव मोरे, अरुण सोमासे, नंदकुमार लादे, बाळासाहेब सोमासे, गंगाधर जाधव, माने महाराज, अंकुश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 जाधववाडीच्या पाणीप्रश्नासाठी तातडीने पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अभिजीत ‘आबा’ पाटील यांचे आभार मानले.

#जाधववाडी #मोडनिंब #पाणीप्रश्न #गावठाणतलाव #पाईपलाईन #विकासकाम #अभिजीतआबापाटील

Post a Comment

0 Comments