ज्येष्ठ नेते बाबू सुर्वे यांच्या हस्ते प्रतिमापूजन; ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
मोडनिंब : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावचे ज्येष्ठ नेते बाबू सुर्वे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रसेवा, सत्य, अहिंसा, साधेपणा आणि शिस्तीच्या विचारांना उजाळा दिला.
या प्रसंगी माजी सरपंच कैलास तोडकरी, मनसे नेते प्रशांत गिड्डे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे हनुमंत कुंभार गुरुजी, दीपक सुर्वे, माजी सरपंच नवनाथ मोहिते, चांगदेव वरवडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सावंत, किरण तोडकरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुर्वे, शुभम गायकवाड, ओम व्यवहारे, गीताबाई आखाडे
आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या सत्य-अहिंसेच्या विचारांसोबतच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीच्या आदर्शांचे स्मरण यावेळी करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातील या कार्यक्रमामुळे दोन्ही महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

Post a Comment
0 Comments