Type Here to Get Search Results !

शहीद निवृत्ती जाधव स्मृतिदिन; पंचक्रोशीतून उमटणार अभिवादनाचा हुंकार.


अभिवादन करण्यासाठी पंचक्रोशी एकवटणार!

श्रीपूर, पंचक्रोशीतील शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार व रविवार, ३ व ४ ऑक्टोबर रोजी श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व ग्रामस्थांची रॅली, सलामी व श्रद्धांजली, शहीद निवृत्ती जाधव अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन तसेच पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.

शनिवारी सकाळी ७.३० वाजता शहीद निवृत्ती जाधव स्मारक (श्री चंद्रशेखर विद्यालय) येथून विद्यार्थी व ग्रामस्थांची रॅली काढण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळी ९ वाजता सलामी व श्रद्धांजली कार्यक्रमासह अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन आणि पुरस्कार वितरण होणार आहे.

या कार्यक्रमास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्था, माळशिरस-श्रीपूर, श्री चंद्रशेखर विद्यालय, नारायणकाका आगाशे कला वाणिज्य महाविद्यालय आणि प्राथमिक शाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📍 स्थळ : शहीद निवृत्ती जाधव स्मारक, श्रीपूर (श्री चंद्रशेखर विद्यालय), ता. माळशिरस, जि. सोलापूर


Post a Comment

0 Comments