संपादक-प्रा.सदानंद बनसोडे.
मोडनिंब : क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले.
या कार्यक्रमास एपीआय पवार साहेब, माजी सरपंच कैलास तोडकरी, आरपीआयचे एन. जी. ओहोळ, मनसेचे प्रशांत गिड्डे, सत्यनारायण गिड्डे, सदाशिव पाटोळे, अमित कोळी, अमर ओहोळ, किरण खडके, दीपक सुर्वे, नाना मंडले, पोपट जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुर्वे व शुभम गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीचा जागर करण्यात आला.

Post a Comment
0 Comments