Type Here to Get Search Results !

गुरुजनांच्या सन्मानाने चांदापुरीत उजळला शिक्षक दिन!



सदाशिवराव निवासी प्रशाला व ज्यू कॉलेजमध्ये विविध उपक्रमांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा.
चांदापुरी : विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या आणि संस्कारातून सक्षम पिढी घडविणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदाशिवराव निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज, चांदापुरी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थेतील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगते आणि अभिनव उपक्रम सादर करून आपल्या गुरुजनांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
“शिक्षक हा केवळ शिकवणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा शिल्पकार असतो,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त संस्थेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि मूल्ये हीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी शिदोरी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शिक्षकांचा सन्मान, संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प!
शिक्षकांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, गुरुजनांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्ये आपल्या आचरणात उतरवून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर संस्थेचे तसेच समाजाचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments