Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ नेत्या पुष्पमाला पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन; भोसेंसह परिसरात शोककळा

 

भोसे (ता. पंढरपूर) 

भारत स्पंदन न्यूज


भोसे येथील ज्येष्ठ नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. यशवंतभाऊ पाटील यांच्या पत्नी पुष्पमाला यशवंत पाटील (वय ८८) यांचे बुधवारी (दि. १४) रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांसह भोसे व परिसरात शोककळा पसरली आहे.

पुष्पमाला पाटील या राजुबापू पाटील यांच्या मातोश्री होत. सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. यशवंतभाऊ पाटील यांच्या पत्नी म्हणूनही त्यांची परिसरात ओळख होती.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन सुना, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. भोसेचे माजी उपसरपंच शेखर पाटील यांच्या त्या मातोश्री, तर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि भोसेचे सरपंच गणेश पाटील यांच्या त्या आजी होत.

बुधवारी सायंकाळी भोसे-नेमतवाडी रस्त्यावरील इनाम शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments