पंढरपूर:
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा-एफ) च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या तालुक्यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा पंढरपूर येथे करण्यात आली.
तालुका आणि नवनिर्वाचित पदाधिकारी:
- माळशिरस तालुका: डॉ. मनिष गायकवाड (तालुकाध्यक्ष), जोतीराम नाईकनवरे (उपाध्यक्ष)
- मंगळवेढा तालुका: संतोष माने (तालुकाध्यक्ष)
- पंढरपूर तालुका: समाधान गाजरे (तालुकाध्यक्ष)
- सांगोला तालुका: आप्पासाहेब कोकरे (तालुकाध्यक्ष)
यासोबतच सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी लाडे आणि खजिनदारपदी संजय मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया मेस्टा-एफचे प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे, प्रदेश सचिव गणेश निळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण, सचिव शरद कळवसकर आणि जिल्हा संघटक गणपत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या प्रसंगी जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments