Type Here to Get Search Results !

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा


नांदोरे : पायल फाउंडेशन संचलित एस. पी. पब्लिक स्कूल, नांदोरे येथे हिंदी दिवस विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, गोडवा आणि समृद्ध परंपरा आपल्या विविध सादरीकरणातून प्रभावीपणे मांडली.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून शाळेत वर्गनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथाकथन, भाषण, रेखाचित्र, निबंध लेखन आदी स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले कलागुण, सर्जनशीलता आणि भाषिक कौशल्य दाखवून दिले. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची हिंदी भाषेवरील भाषणे, हिंदी गीतांचे सादरीकरण, प्रश्नमंजुषा आणि पहेली यांसारखे विविध कार्यक्रमही घेण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्यातील वक्तृत्व, सादरीकरण आणि विचारशक्तीला चालना मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली जवळेकर हिने प्रभावीपणे केले. हिंदी विभागाच्या चव्हाण मॅडम, निंबाळकर सर, पठाण सर, पिसे मॅडम, हजारे मॅडम आणि देशपांडे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, खजिनदार विक्रम भिंगारे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, एच.ओ.डी. साईनाथ कुंभार, माऊली मोकळे, सचिन डोके, फाउंडेशन विभाग प्रमुख विकास तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.


हिंदी दिवसाच्या निमित्ताने आयोजित या विविध उपक्रमांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी ‘हिंदी भाषा—आपली समृद्ध भाषिक परंपरा’ हा संदेश आपल्या सहभागातून अधोरेखित केला.

Post a Comment

0 Comments