Type Here to Get Search Results !

एस. पी. पब्लिक स्कूल अँड वेदांता अकॅडमी, नांदोरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी.

 

नांदोरे प्रतिनिधी :

दिनांक: २२ सप्टेंबर २०२६

पायल फाउंडेशन संचलित एस. पी. पब्लिक स्कूल अँड वेदांता अकॅडमी, नांदोरे येथे शिक्षणमहर्षी व समाजसुधारक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी कर्मवीरांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

“रयतेच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी” या ध्येयाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक चळवळीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, श्रम, स्वावलंबन आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर आणि विभाग प्रमुख साईनाथ कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.


ज्ञान, संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी,
 
असा संदेश यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments